Maharashtra Election 2019 : विधानसभा उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:44 PM2019-10-10T12:44:08+5:302019-10-10T12:47:24+5:30

सोशल मीडियावर भिस्त, रॅलीवर भर...

Maharashtra Election 2019 : rain down Crisis will on assembly election promotion | Maharashtra Election 2019 : विधानसभा उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे सावट

Maharashtra Election 2019 : विधानसभा उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे सावट

Next
ठळक मुद्देनिवडणुकीची रणधुमाळी : मोकळ्या जागा, मैदानांऐवजी मंगल कार्यालयात सभांचे नियोजनविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवस

पिंपरी : परतीचा पाऊस दररोज जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात रस्ते दररोज जलमय होत आहेत. काही ठिकाणी पाणी साचून राहत आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर होत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मैदानांवरील सभा आयोजित करण्याबाबत राजकीय पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत.  त्यामुळे यापुढे होणा-या काही सभा मंगल कार्यालय व सभागृहांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवस मिळाले. त्यात विजया दशमीला उमेदवारांकडून अपेक्षित प्रचार झाला नसल्याचे दिसून येते. युती व आघाडीकडून बहुतांश ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. चिंचवड, भोसरी व पिंपरी या तिन्ही मतदारसंघात उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. परिणामी उमेदवारी मिळविण्यातच इच्छुकांची दमछाक झाली. या सर्व अडथळ्यांना पार करून उमेदवारांनी प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली. मात्र गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यात अडथळे येत आहेत. 
शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुती व आघाडीतर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या सभेचेही नियोजन आहे. या सभा शहरातील विविध मोकळ्या जागांवर, मैदानांवर घेण्याचे नियोजन होते. मात्र पाऊस उघडीप देत नसल्याने यातील काही सभांच्या ठिकाणांत बदल करण्यात येत आहे. या पुढील सभा मंगल कार्यालय, सभागृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांची दमछाक होत आहे. स्टार प्रचारकांच्या जास्तीत जास्त सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात, यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करीत आहे. सभेचे ठिकाणही सर्वांना सोयीचे आणि जास्तीत जास्त गर्दी होऊ शकेल, यासाठी या उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र पावसामुळे त्यांचाही नाईलाज झाला आहे. 
............
सोशल मीडियावर भिस्त, रॅलीवर भर  
प्रचाराला कमी दिवस असून, त्यात पावसाचा अडथळा होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचाराची भिस्त आहे. बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या हातातील मोबाइलवर आपला ‘मेसेज’ पोहचवून सोशल मिडियाद्वारे प्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच पावसामुळे सभा घेण्यात अडचणी येत असल्याने काही उमेदवारांकडून स्टार प्रचारकांच्या रॅलीवर भर देण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : rain down Crisis will on assembly election promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.