पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:20 PM2020-01-18T13:20:49+5:302020-01-18T13:23:57+5:30

पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष : अवैध धंदे व गुन्हेगारीत होतेय वाढ..

Illegal prostitution business in the hotels and lodges within the limits of the Pimpri-Chinchwad Police Commissioner | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

googlenewsNext
ठळक मुद्देमटका, जुगार, बेकायदा मद्यविक्री व हुक्का पार्लरमुळे येथील गुन्हेगारीत सातत्याने वाढ तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू यांचा दुवा म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख

पिंपरी : संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर हे अवैध धंद्याचे आगार बनले आहे. मटका, जुगार, बेकायदा मद्यविक्री व हुक्का पार्लरमुळे येथील गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये आता बेकायदा वेश्याव्यवसायाची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. 
तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू यांचा दुवा म्हणून पिंपरी-चिंचवड शहर ओळखले जाते. महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने उद्योगनगरी पावन झाली आहे. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक व धार्मिक संस्कृतीला मात्र अवैध धंद्यांचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही सोयीस्कर राजकारणामुळे व आर्थिक उलाढालीमुळे राजकीय नेते गप्प आहेत. त्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने सर्वकाही आलबेल आहे. 
तीर्थक्षेत्र आळंदी रस्त्यावरील देहूफाटा, चºहोली फाटा व मरकळ रस्ता या ठिकाणी दिवसाढवळ््या देहविक्री करणाºया महिला येथून मार्गस्थ होणाºया भाविकांना खुणावत उभ्या राहतात. या व्यवसायामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला असलेले हॉटेल व लॉजधारक सामील आहेत. आळंदी रस्ता, तळेगाव ते वडगाव मावळ महामार्ग, देहू व चºहोली फाटा, भोसरी, पिंपरी व निगडी येथील सुमारे ४१ हॉटेल व लॉजवर हा वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू आहे. हे माहिती असूनही कारवाईऐवजी पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
.......
देहविक्रय करणाºया महिलांचा महामार्गांवर वाढला वावर
शहरातून पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, तसेच मुंबई-बेंगळुरू महामार्ग जातात. देहविक्रय करणाºया महिला या महामार्गांवर दररोज सायंकाळनंतर ठिकठिकाणी घोळक्याने दिसून येतात. वाहनचालकांना हात दाखवून तसेच खुणावून थांबवितात. वाहनचालक तसेच लहान मुले व इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच चोरीच्या घटनांसह वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. 
.........
पिंपळे सौदागरचे नागरिक झाले त्रस्त 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट परिसर म्हणून पिंपळे सौदागरची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या भागात क्लबच्या नावाखाली जुगार, मटका, तीन पत्ती, सोरट यांसह अनेक प्रकारचे  बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांना व महिलांना या प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या लगतचा परिसर म्हणून पिंपळे सौंदागरमध्ये मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू नागरिक राहतात. क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार व मटक्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कष्टकरी, रिक्षाचालकापासून ते गुंठामंत्र्यापर्यंत अनेकांची पावले क्लबकडे वळली आहेत. शाळा-कॉलेजला चाललो असे सांगून तरुणही क्लबमध्ये जात आहेत. 

Web Title: Illegal prostitution business in the hotels and lodges within the limits of the Pimpri-Chinchwad Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.