‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:57 PM2021-07-30T16:57:50+5:302021-07-30T16:58:27+5:30

पिंपरीच्या रहाटणी फाट्यावरील घटना; याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक

‘I will not acknowledge. Do what you want, 'said the police officer, pushing the woman | ‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की

‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की

Next

पिपंरी : दुचाकीवरून विना मास्क आलेल्या एका व्यक्तीला पावती करण्यास सांगितल्याने दुचाकीस्वाराने पोलिस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली. तसेच ‘मी पावती करणार नाही. तुला काय करायचे ते कर. माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात’ असे म्हणत हुज्जत घातली. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणी फाटा येथे घडली.

राजू प्रकाश भाटी (वय ३६, रा. उषा मनोहर सोसायटी, औंधगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस नाईक रोहिणी सूर्यवंशी यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी नाईकया सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या रहाटणी फाटा येथे वाहतूक नियमनाचे तसेच विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम करता होत्या. त्यावेळी राजू त्याच्या दुचाकीवरून विनामास्क येताना दिसला.

त्यामुळे सूर्यवंशी यांनी त्याला थांबवून विनामास्कची पावती करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने राजू याने पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली. तसेच ‘मी पावती करणार नाही. तुला काय करायचे ते तू कर. माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात’ असे बोलून हुज्जत घातली. तसेच त्यांचे सहकारी पोलिस शिपाई पाटील यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: ‘I will not acknowledge. Do what you want, 'said the police officer, pushing the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.