त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:16 PM2020-08-12T17:16:13+5:302020-08-12T17:31:59+5:30

अपघाताचे निमित्त करत मॅनेजरला शिवीगाळ व दमदाटी करून दोन्ही पायाला फॅक्चर केले.

He gave contract of worth Rs 1.5 lakh to the manager of the harassing company; Incident at Talegaon MIDC | त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी

त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी चार अज्ञातांवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

वडगाव मावळ : दीड लाखाची सुपारी घेऊन तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीमधील त्रास देणाऱ्या मॅनेजरला मारहाण करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डोंगशीन कंपनीचार चाकीतून घरी चाललेल्या सीनियर जनरल मॅनेजर मुथया सुबय्या बडेदरा यांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी गाडीला धक्का दिला. त्यानंतर अपघाताचे कारण देत आणखी दोघांसह हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरच्या दोन्ही पायावर हॉकी स्टिकने मारहाण करत दुखापत केली व फॅक्चर केले. याप्रकरणी चार अज्ञातांवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा तपास त्याचा तपास सुरु होता.

स्थानिक गुन्हे शाखा असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकास दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्या. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमी दाराच्या मार्फतीने तसेच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली त्यामधी करणकुमार चल्ला मत्तु (वय २३ रा. गांधीनगर, देहुरोड), बालाजी रमेश मुदलीयार (वय २७ रा. MB कॅम्प देहूरोड), राकेश शिवराम पेरूमल (वय२५ रा. MB कॅम्प देहुरोड ) या आरोपींना ताब्यात घेतले असून, मुस्ताक जमील शेख (वय २५ रा. गांधीनगर, देहुरोड) याला कोरोना झाल्यामुळे उपचार घेत असल्याने ताब्यात घेण्याची तजवीज ठेवली आहे. सदर आरोपींकडे सखोल चौकशी करता चौकशीमध्ये आशिष ओव्हाळ (रा.विकास नगर ,देहूरोड, पुणे) यांनी आम्हाला दीड लाखाची सुपारी देऊन मला डोंगशीन कंपनीचा मॅनेजर त्रास देत आहे. तुम्ही त्यास फॅक्चर करा असे सांगून सुपारी दिली असल्याबाबत चौकशीत निष्पन्न झाले आहे

 सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय पृथ्वीराज ताटे सहायक फोजदार विजय पाटील , प्रकाश  वाघमारे, सचिन गायकवाड ,गणेश महाडिक स्थानिक गुन्हे शाखा यांनी कारवाई केली.

Web Title: He gave contract of worth Rs 1.5 lakh to the manager of the harassing company; Incident at Talegaon MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.