प्लॉट विक्रीच्या बहाण्याने साडेचौदा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 03:13 PM2019-10-15T15:13:46+5:302019-10-15T15:15:49+5:30

आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन धनादेश तसेच रोख स्वरुपात १४ लाख ६९ हजार ९३६ रुपये घेतले.

Fraud of fourteen and half lakh in the case of plot sale | प्लॉट विक्रीच्या बहाण्याने साडेचौदा लाखांची फसवणूक

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने साडेचौदा लाखांची फसवणूक

Next

पिंपरी : प्लॉट विकत देण्याचे ठरल्यानंतर विश्वासात घेऊन १४ लाख ६९ हजार ९३६ रुपये घेतले. मात्र प्लॉट दिला नाही. बाणेर येथे ९ फेब्रुवारी २०१५ ते १४ ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. या फसवणूकप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष रामचंद्र खडतरे (वय ६७, रा. कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार के. शब्बीरबाबू अबुबकर कीझाक्कुम (वय ४२, रा. औंध, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कीझाक्कुम याने प्लॉट विक्री करायचे सांगून फियार्दी यांना प्लॉट दाखविला. संबंधित प्लॉट विकत देण्याचे ठरल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन धनादेश तसेच रोख स्वरुपात १४ लाख ६९ हजार ९३६ रुपये घेतले. प्लॉट खरेदी करून सातबारा करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र खडतरे यांना कोणताही प्लॉट न देता आरोपी कीझाक्कुम याने त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of fourteen and half lakh in the case of plot sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.