Four motorcycles were stolen from the city of Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकी चोरीला
पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकी चोरीला

पिंपरी :  भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरातून १ लाख ५० हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
          सुमीत ईश्वर मोहरकर (वय २६, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत यांनी रविवारी (दि. ४) पहाटे त्यांची एम एच १४ / जी एल ३२२१ ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी विशालनगर येथील शिवसृष्टी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी गाडीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.
          विजया संजय राऊत (वय ४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ३) रात्री साडेबाराच्या सुमारास विजया यांनी त्यांची एम एच १४ / डी पी ५५५१ ही १५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली.
           शिवानंद सिद्धराम साखरे (वय ३९, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. शिवानंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवानंद यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास हिंजवडी मधील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मैदानात त्यांची एम एच १३ / सी आर २३७४ ही ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
         गणेश नबु श्रीवार (वय ३९, रा. पाचाणे, मावळ) यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची एम एच १४ / ए आर ०६२८ ही दुचाकी शुक्रवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी मधील बिग बाजार येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Four motorcycles were stolen from the city of Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.