Five-year-old girl abused by her father | जन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार
जन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देजन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचारहिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : चिमुकलीला गंभीर दुखापत

पिंपरी : पाच वर्षीय चिमुकलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलीच्या लैंगिक अवयवास गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले. त्यावर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता वडिलांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवली असता पती मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले. ही घटना बावधन येथे २६ ते २७ जून २०१९ या कालावधीत घडली.
 याप्रकरणी चिमुकलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुकलीच्या पोटात अचानक दुखू लागले. उपचारासाठी आईने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीवर उपचार करतेवेळी तिच्या लैगिंक अवयवांना गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याची कल्पना डॉक्टरांनी मुलीच्या आईला दिली. यावर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावर वडिलांनीच मुलीशी गैरवर्तन केले असल्याचे मुलीने सांगतिले. याची खात्री करण्यासाठी फिर्यादी महिला यांनी रात्री झोपेचे सोंग घेत पतीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. त्यावेळी आरोपी हा मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांना दिसले. याबाबत पतीला जाब विचारला असता फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी याने आपल्या अल्पवयीन मुलीशीच गैरवर्तन करत तिला गंभीर दुखापत केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करत आहेत.

Web Title: Five-year-old girl abused by her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.