रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:15 PM2019-08-16T22:15:42+5:302019-08-16T22:17:04+5:30

वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली.

Five arrested from Ravan gang ; achievement of nigdi police | रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी

रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी

Next

पिंपरी :  वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावट रिव्हॉल्वर, तीन लोखंडी कोयते आणि रोकड असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्य आहेत.

अविनाश दिलीप शेलार (वय १९), स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे (वय २२), नरेश शंकर चव्हाण (वय १९), सूर्यकांत सुनील फुले (वय १९, सर्व रा. चिंचवड), किरण शिवाजी खवळे (वय २०, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ११) अवतार सिंग आणि त्यांचा सहचालक ट्रान्सपोर्टनगर येथे त्यांच्या ट्रकमध्ये (पी बी १० / जी झेड ५९१३) आराम करत होते. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग यांच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारले. यामध्ये त्यांचे दात पडले. तर सहचालक हरमित सिंग यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. टोळक्याने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने २ हजार २०० रुपये चोरून नेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांना हे आरोपी रावण टोळीचे सदस्य असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आकुर्डी स्टेशन येथे दोघेजण दुचाकीवरून वेगात जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने पकडले. त्यांच्याकडे अवतार सिंग यांना मारहाण केल्याचा गुन्हा केल्याबाबत विचारले असता त्यांनी त्यांच्या चार साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावट रिव्हॉल्वर, तीन लोखंडी कोयते आणि रोकड असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. एका अल्पवयीन मुलासह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Five arrested from Ravan gang ; achievement of nigdi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.