'जामतारा' वेबसिरीज पाहून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:34 PM2021-05-13T21:34:27+5:302021-05-13T21:34:38+5:30

जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची करत होते फसवणूक....

Exposing an international gang who fruad with american citizens; Action of Pune Rural Local Crime Branch | 'जामतारा' वेबसिरीज पाहून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

'जामतारा' वेबसिरीज पाहून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next

लोणावळा : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांना फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याच्या आवारात दारासमोर गांजाची शेती करणार्‍या 15 जणांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. वाकसई (ता. मावळ) येथे बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

घनवट यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, कौशल जगदीश राजपुरोहित यांचे मालकीच्या वाकसई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर 15 मध्ये असणारा सुरावत विल्ला नावाच्या बंगल्यामध्ये विनोद सुभाषचंद्र राय (रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी एम 19, विरार बेस्ट, ठाणे) हा व त्याचे सहकारी हे कॉम्पुटर व मोबाईल सॉफ्टवेअरवरून व्हॉईसमेल पाठवून मलमइमं व गजमद या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून अमेरिकेतील लोकांची फसवणुक करून त्यातून बेकायदेशीर रित्या हवालाकरवी पैसे जमा करीत आहेत. याच माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकत ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अभिनव दिपक कुमार (रा. कन्हैया भैरव रेसीडेन्सी, मीरा रोड, ठाणे),निनाद नंदलाल देवळेकर (रा. शिवसुंदर कॉम्प्लेक्स, बदलापूर इस्ट, ठाणे, मुळगाव गुहागर, रत्नागिरी, जि. रत्नागिरी), राकेश अरुण झा (रा. इमरल्ड हाईटस् मानसरोवर, नवी मुंबई), शंतनू शाम छारी (रा. गौरवसिटी, कनाकिया, मिरा रोड, मुंबई),  दीप प्रिन्स चक्रवर्ती (रा. साई सिटी कॉम्प्लेक्स, ग्रीन क्यू, बालासोपारा बेस्ट, ठाणे), निलेश बेल्जी पटेल (रा. सुर्यकुमार सोसायटी, खुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई), विनोद सुभाषचंद्र राय (रा. इव्हरशाईन ग्लोबल सिटी विरार वेस्ट, ठाणे), शाहीद शोएब खान (रा. शांतिनिकेतन कॉम्प्लेक्स. एस. के. स्टोन, मिरा भाईंदर, ठाणे), इम्तेखाब निजामुद्दीन शेख (रा. अजिमनगर मालवणी, मालाड, मुंबई 95), गौरव देवेंद्र वर्मा ( रा. कल्पतरू सोसायटी, बोरीवली, मुंबई), बाबु राजू सिंग (रा. निरव पार्क बिल्डींग, भारती पार्क, मॅग्नॉल्डचे समोर, मिरा रोड, ईस्ट, ठाणे), विनायक धनराज उचेडर (रा. ठाकूर गाव, सिंग इस्टेट, विनायक सोसायटी, कांदिवली इस्ट, मुंबई), अभिषेक संजय सिंग (रा. साई विकास अपार्टमेंट, साईबाबा नगर, मीरा रोड, ठाणे इस्ट), मोहम्मद झमा अख्तर हुसेन मिर्झी (रा. चंद्रेश छाया लोढा कॉम्प्लेक्स, लोढा रोड, मिरा रोड इस्ट, ठाणे), शैलेश संजय उपादयाय (रा. कुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. 

वरील सर्व आरोपींनी जुलै 2020 ते आजपर्यंत संगनमताने वाकसाई लोणावळा येथील सुरावत विल्ला नावाच्या बंगल्यामध्ये इंटरनेट व संगणक तसेच मोबाईल फोन व सॉफ्टवेअरचा उपयोग करून अमेरिकेतील नागरिकांचे मोबाईल फोन नंबर, नाव व इतर माहिती बेकायदेशीररित्या प्राप्त केले. तसेच या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरिकांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केली. 

वरील नमुद आरोपी कौशल जगदीश राजपुरोहित (रा. लोणावळा) याच्या मालकीचा व सध्या विनोद सुभाष राय (रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी एम 12 विरार वेस्ट ठाणे )याच्या ताब्यात असणारा सुरावत विल्ला नावाच्या बंगल्याच्या आवारात बेकायदा बिगर परवाना ४३० ग्रॅम वजनाची व ६ हजार रुपये किंमतीची सात गांज्याची झाडांची स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लागवड केली. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार सूर्यकांत मारुती वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Exposing an international gang who fruad with american citizens; Action of Pune Rural Local Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.