Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे आठ लाख लोकांमध्ये आढळल्या 'कोरोना अँटिबॉडीज'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:05 PM2020-11-03T12:05:51+5:302020-11-03T12:10:29+5:30

दिवाळी सण, हिवाळा असल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही...

Corona Virus : Corona antibodies were found in about eight lakh people in Pimpri-Chinchwad city | Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे आठ लाख लोकांमध्ये आढळल्या 'कोरोना अँटिबॉडीज'

Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे आठ लाख लोकांमध्ये आढळल्या 'कोरोना अँटिबॉडीज'

Next
ठळक मुद्देपुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झाल्याचा सर्वेक्षण निष्कर्ष

पिंपरी: महानगरपालिका परिसरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे, नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे का ? यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शहरातील ते ३३.९ टक्के जणांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे आठ लाख नागरिकांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.
 

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झाल्याचे सर्वेक्षण निष्कर्ष सांगतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर च्या वतीने दिनांक ७ ते १७ ऑक्‍टोबर रोजी पाहणी करण्यात आली. 
........
 कसे झाले सर्वेक्षण त्यासाठी विविध २०० भाग निवडून दहा पथके तयार करण्यात आली होती. दहा दिवस सर्वेक्षण करून पाच हजार जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तसेच आयजीजी अँटिबॉडी तपासणीसाठी आयसीएमआर द्वारे प्रमाणित अबोट सीएमआयए टेस्ट करण्यात आली होती. 
.......... 

निष्कर्ष एकूण २७ लाख लोकसंख्या लक्षात घेता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८ टक्के, झोपडपट्टी सदृश्य भागातील नागरिकांमध्ये ३८.३ टक्के, गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या. तसेच ३६.८ टक्के महिलांमध्ये तर २८.९ टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत. पुरुषांपेक्षा महिलां मधील अँटीबॉडी अधीक विकसित अधिक असल्याचे दिसून आले आहेत. तसेच ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये हे अँटीबॉडीज अधिक आढळून आले आहेत. त्याचा दर ३५.५ इतका आहे तसेच किशोरवयीन बारा ते अठरा वर्षाच्या वयोगटामध्ये ३४.९ टक्के तर १९ ते ३३ या वयोगटांमध्ये २९.७, ३१ ते ५९ वयोगटांमध्ये ३१.२ आणि व ६६ वर्षावरील नागरिकांमध्ये २८.३ टक्के अँटीबॉडीज आढळून आलेले आहे. कोविडमुळे असणारा सर्वसामान्य मृत्यूदर ०.१८ असल्याचे असल्याचा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. 
......... 
पत्रकार परिषदेस महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके , विरोधी पक्ष नेता राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने, महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली डांगे, तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज डॉ. अमित बॅनर्जी, भार्गव गायकवाड, अतुल देसले आदी उपस्थित होते. 

........

 आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''सर्वेक्षणांमध्ये दोनशे ठिकाणे निवडण्यात आले होते. त्यातून एकूण लोकसंख्येपैकी ३३.९ टक्के पॉझिटिव्ह दिसून आल्याचे सर्वेक्षणातून दिसते. दिवाळी सण, हिवाळा असल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.''

Web Title: Corona Virus : Corona antibodies were found in about eight lakh people in Pimpri-Chinchwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.