पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:06 AM2021-06-22T11:06:38+5:302021-06-22T11:06:48+5:30

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज

corona period 63 suicides in Pimpri-Chinchwad; Many ended their lives in depression | पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

Next
ठळक मुद्देअडीच वर्षात शहरातील ११८ जणांनी संपविली जीवनयात्रा

नारायण बडगुजर

पिंपरी:कोरोनामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. तरुण, व्यावसायिक हातावर पॉट असलेले नागरिक सर्वानाच या महामारीचा फाटक बसला. त्यांच्यासमोर कुटुंब कसे जगवायचे हा प्रश्नही उपस्थित झाला होता. अशा चिंताजनक परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दीड वर्षांत ६२ आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर मागील अडीच वर्षात ११८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज आहे. असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्रातील कामगार, आयटीयन्स यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्याच तुलनेत व्यावसायिक व हातावर पोट असलेले सामान्य कुटुंब देखील आहेत. यातील प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका बसला. बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे देखील अनेकांची पावले वळली आहेत. मात्र अनेक जण मनाने खचले. त्यातून सावरणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी टोकाची भूमिका घेत त्यांनी आत्महत्या केली. यातून त्यांच्या आयुष्यासह त्यांचे कुटुंब देखील उद्धवस्त झाले. अनेकांची मुले उघड्यावर आली. तसेच काही जणांचा म्हातारपणाचा आधार गेला. नवविवाहित असलेल्या काही जणांनी आत्महत्या केली. यात त्यांच्या जोडीदाराला मोठा मानसिक धक्का बसला.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार गेल्यास त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. तसेच त्याला पुन्हा काम मिळण्यासाठी प्रयत्न करून किंवा इतर उद्योग व्यवसायाठी आर्थिक तसेच प्रत्यक्ष हातभार लावावा. घरातील तरुण, विद्यार्थी किंवा कोणतीही व्यक्ती मनाने एकटी पडणार नाही किंवा त्यांचा एकलकोंडेपणा वाढणार नाही, यासाठी त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. प्रसंगी आवश्यकतेनुसार मानसोपचार तज्ज्ञ, डाॅक्टर यांच्याकडे नेऊन समुपदेशन व योग्य उपचार करावेत.

"प्रत्येकाने आपले दु:ख तसेच इतर भावना जवळच्या किंवा विश्वासू व्यक्तील सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी बोलते राहून वेळोवेळी मन मोकळे करावे. घरातील प्रत्येकाने एकमेकांबाबत निरीक्षण करून वागण्यातील बदल, चांगले व खटकणारे बदल काय, हे निदर्शनास आणून द्यावेत. त्यामुळे चुका सुधारण्यास मदत होईल. तसेच चांगले काम करण्याचा उत्साह वाढेल.'' असे  वायसीएम रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मनजित संत्रे यांनी सांगितले आहे. 

शहरातील आत्महत्या

२०१९ - ५५
२०२० - ३७
२०२१ (मे पर्यंत) - २६

Web Title: corona period 63 suicides in Pimpri-Chinchwad; Many ended their lives in depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.