Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला अडीच हजारांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 08:10 PM2020-06-27T20:10:57+5:302020-06-27T20:15:28+5:30

दिवसभरात १६० नवे रुग्ण : ८२ जण झाले कोरोनामुक्त

Corona patients crossed the stage of two and a half thousand In the city of Pimpri-Chinchwad | Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला अडीच हजारांचा टप्पा

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला अडीच हजारांचा टप्पा

Next
ठळक मुद्दे दिवसभरात ५६६ संशयित रुग्ण रुग्णालयात झाले दाखलमृतांची संख्या ७० वर पोहोचली असून यात महापालिका हद्दीबाहेरील २७ जणांचा समावेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून शनिवारी दिवसभरात १६० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील पाच रुग्णांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५६५ वर गेली आहे. तर ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५६६ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ७० वर पोहोचली असून यात महापालिका हद्दीबाहेरील २७ जणांचा समावेश आहे.

औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील एकूण १६० जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ८८ पुरुष, तर ७२ महिलांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील तीन पुरूष व दोन महिला अशा एकूण पाच जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये गांधी नगर, पिंपरी येथील ५२ वर्षीय पुरुष व पिंपळे सौदागर येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३७९ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तसेच ५४६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून दिवसभरात ५२९ जणांना घरी सोडण्यात आले.
सानेवस्ती चिखली, बौध्दनगर पिंपरी, हॉटेल सृष्टी पिंपळे गुरव, भारतनगर दापोडी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख, पवारवस्ती दापोडी, आनंदनगर सांगवी, दिघीरोड भोसरी, बोपखेल, साईबाबानगर चिंचवड, पाचपीर चाळ काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, यमुनानगर निगडी, अजंठानगर, इंद्रायणीनगर भोसरी, जगताप डेअरी पिंपळे निलख, रौंधळे चाळ दापोडी, जयभीमनगर दापोडी, आनंदनगर चिंचवड, घरकुल चिखली, सुदर्शननगर चिखली, कोकणेनगर काळेवाडी, पूर्णानगर, दत्तनगर चिंचवड, मिलींदनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, बिजलीनगर चिंचवड, गणेशनगर सांगवी, गांधीनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, केंद्रीय विद्यालय मोशी, शमार्चाळ नेहरुनगर, येरवडा, कुर्डवाडी, गणेशखिंड, देहुरोड कॅन्टोनमेंट, मंगळवार पेठ, बोपोडी येथील रहिवासी असलेल्या रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 

Web Title: Corona patients crossed the stage of two and a half thousand In the city of Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.