चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 06:52 PM2019-09-25T18:52:54+5:302019-09-25T18:56:07+5:30

मतदार संघात ५४ विभागीय अधिकारी आणि कार्यालयासाठी आता अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत.

Chinchwad is the largest constituency in the city | चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ

चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभेच्या अर्जाची प्राधिकरण कार्यालयातून वाटप, स्वीकृती : निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दैनंदिन कामकाज थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातून होणार असून अर्जचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप, मतपत्रिका छपाई आकुर्डीर्तल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावरुन होणार आहे, तर चिंचवड मतदार संघ  शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे, अशी माहिती चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार असून शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीची माहिती कुंभार यांनी दिली.  चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय थेरगाव येथील महापालिका शाळेत आहे. मनिषा कुंभार म्हणाल्या,  शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ असून ५  लाख १६ हजार ८३६  एकूण मतदार आहेत. त्यामध्ये २ लाख ४५ हजार ४८६ पुरुष तर २ लाख ४१ हजार ३१८ महिला आणि ३२ इतर मतदार आहेत.
 

नवीन मतदार वाढले
लोकसभा निवडणूकीनंतर  तीन महिन्यात १४ हजार ९६ नव मतदारांची वाढ झाली आहे. पुरवणी मतदारयादी चार आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. नवमतदारांची संख्या वाढली आहे, असे कुंभार यांनी सांगितले.
 

दिव्यांगासाठीही मतदान केंद्र
चिंचवड मतदारसंघात ४३९ मतदान केंद्र असणार आहेत. सहाय्यकारी मतदान केंद्रे ५२ आहेत.  ५९ खासगी इमारती आणि ३१ सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २९ आणि दुस-या मजल्यावर १५ मतदान केंद्रे असणार आहेत. त्याठिकाणी लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी तळमजल्यावर ६५१ मतदान केंद्रे असणार आहेत. मोकळ्या मैदानावर, पार्किंगमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
 

भरारी पथक तैनात
मतदार संघात ५४ विभागीय अधिकारी आणि कार्यालयासाठी आता अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना व्होटर स्लिप वाटपण करणे, मतदान केंद्राची सद्यस्थिती, आकडेवारीची माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. खर्च, तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. प्रचाराच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना असणार आहे. भरारी, व्हिडीओ सर्व्हिलन्स, स्टॅटेस्टिक पथके तैनात असणार आहेत. चार निरीक्षक असणार आहेत. चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठी एकच निरीक्षक असतील, असेही कुंभार म्हणाल्या.

Web Title: Chinchwad is the largest constituency in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.