नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 09:01 PM2019-08-10T21:01:52+5:302019-08-10T21:03:41+5:30

नदीपात्राच्या प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

charges filed against two person for throwing a shovel into a riverbed | नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा 

नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा 

Next

पिंपरी : दगड, माती, विटा असलेला राडारोडा ट्रॉलीमधून आणून पवना नदीपात्रात टाकला. कासारवाडी येथे शुक्रवारी (दि. ९) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नदीपात्राच्याप्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मुन्ना डामोर (वय ३०) व सचिन शहा (दोघेही रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार बाबासाहेब शिंदे (वय ५२, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता आहेत. आरोपी सचिन शहा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर आरोपी राकेश डामोर ट्रॅक्टरचालक आहे. 


आरोपी शहा याच्या सांगण्यावरून आरोपी राकेश याने दगड, माती, विटा असलेला राडारोडा ट्रॅक्टरट्रॉलीमधून आणून नदीपात्रात टाकला. कासारवाडी येथे पिंपळे गुरव रस्त्याला लागून असलेल्या दत्त मंदिराजवळ पवना नदीत राडारोडा टाकण्यात येत होता. त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले. त्यामुळे महापालिका पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार शिंदे यांनी याबाबत तक्रार केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: charges filed against two person for throwing a shovel into a riverbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.