श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला 'ब्रेक'; उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिला तसा 'सिग्नल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:20 PM2020-09-30T18:20:33+5:302020-09-30T18:49:58+5:30

कोरोनाच्या कालखंडामध्ये हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने उपमुख्यमंत्री यांनी अजित पवार यांनी हर्डीकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे..

'Break' discussion on Shravan Hardikar's replacement; Deputy Chief Minister Ajit Pawar gave the 'signal' | श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला 'ब्रेक'; उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिला तसा 'सिग्नल'

श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला 'ब्रेक'; उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिला तसा 'सिग्नल'

Next
ठळक मुद्देबदली लांबणीवर पडल्याची चर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे.  मात्र कोरोनाच्या कालखंडात हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने त्यांची बदली लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशी महापालिकेत चर्चा आहे.

 भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. 

 हर्डीकर यांनी महापालिकेचे सूत्रे हाती घेतल्यानंतर स्मार्ट सिटी, पाणी योजना, वाहतूक नियंत्रण आदी विकास कामांना गती दिली होती.  त्यांचा अडीच वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापूर्वी होत आहे. तसेच राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांचे नाव फडणवीस यांचे विश्वासु अशी टीका केली जात होती, आता महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू अशी टीका केली जात आहे. मात्र हर्डीकर विकासाच्या बाजूने असतात, हे वास्तव आहे.

 मार्चपासून कोरोना सुरू झाल्याने त्यांची बदलीची चर्चा लांबणीवर पडली होती, कोरोनाच्या कालखंडामध्ये हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने उपमुख्यमंत्री यांनी अजित पवार यांनी हर्डीकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मागील आठवड्यामध्ये पुण्यातील बैठकीमध्ये जे अधिकारी काम करणार नाही त्या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असे निर्देश दिले होते. तर दुसरीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना 'तुम्ही काम करत राहा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे हर्डीकर यांची बदली लांबणीवर पडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.

Web Title: 'Break' discussion on Shravan Hardikar's replacement; Deputy Chief Minister Ajit Pawar gave the 'signal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.