सिगारेट घेण्याच्या वादातून डोक्यात मारली बिअरची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:09 PM2020-01-01T15:09:05+5:302020-01-01T15:11:12+5:30

चौघांनी तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण

A bottle of beer hit on the head from cigarette buy issue | सिगारेट घेण्याच्या वादातून डोक्यात मारली बिअरची बाटली

सिगारेट घेण्याच्या वादातून डोक्यात मारली बिअरची बाटली

Next

पिंपरी : किराणा दुकानात सिगारेट घेताना वाद झाला. यात चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच बिअरची बाटली डोक्यात मारली. त्यानंतर कोयत्याने हाताच्या पंजावर मारून तरुणाला जखमी केले. गहुंजे येथे सोमवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
सलमान बशीर शेख (वय २०, रा. गहुंजे, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अशोक बोडके, आशिष बोडके, गोरख बोडके, नीलेश बोडके (सर्व रा. गहुंजे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी सलमान त्यांच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात सिगारेट आणण्यासाठी गेला. दुकानदाराने सिगारेट संपल्याचे सांगितले. त्यावरून सलमान आणि दुकानदार यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर, दुकानदाराने आरोपींना फोन करून बोलावून घेतले. आरोपींनी सलमानला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी अशोक याने बिअरची बाटली सलमानच्या डोक्यात मारून जखमी केले. तर आरोपी आशिष याने कोयत्याने वार केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: A bottle of beer hit on the head from cigarette buy issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.