भोसरी पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:50 PM2019-07-14T12:50:10+5:302019-07-14T12:51:24+5:30

कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करत त्याच्याकडून १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

bhosari police seized 100 kg ganja | भोसरी पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त

भोसरी पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त

Next

निगडी : कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करत त्याच्याकडून १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.
 

अतिक युनूस शेख (वय ३७, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे.भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे , देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: bhosari police seized 100 kg ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.