वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:48 PM2019-05-07T12:48:13+5:302019-05-07T12:52:55+5:30

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे.

ba dcondition of lake who water supply to Wadgaon Maval city | वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

googlenewsNext
ठळक मुद्दे वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजारइंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा

विजय सुराणा 
वडगाव मावळ : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. पाणी असूनही नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली आहे. वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. सुदैवाने शहरात पाण्याची उपलब्धता योग्य आहे. परंतु नियोजन नसल्याने काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. काही ठिकाणी नळाला थेंब थेंब येते, तर काही भागात धो धो पाणी येते. आतापर्यंत शहरात दुष्काळाची झळ न बसल्याने व पाण्याची किंमत न समजल्याने शहरातील काही भागात नळावाटे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वडगावमधील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
वडगाव शहरात पूर्वीपासून ग्रामपंचायत होती. ती बरखास्त होऊन नगरपंचायतमध्ये समावेश झाला आहे. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाईपलाईन टाकून नळजोड द्यायचा नियम आहे. परंतु , ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाईपलाईन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना धो धो पाणी मिळते, तर काहींना थेंब थेब पाणी मिळत आहे.
इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. 
..........
पाण्यासाठी भटकंती

* शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. 
४१० लाख लिटर एवढी साठवण क्षमता या टाक्यांची आहे. तसेच केशवनगर भागासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. वडगाव शहराची लोकसंख्या ३० हजार आहे. त्याप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाणी येते. तर काही ठिकाणी जादा प्रमाणात पाणी येते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
.....
* लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. 
* वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा हा कोसळल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

‘‘केशवनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम महिनाभरात पूर्ण होईल. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार असून, जांभूळ येथील बंधाºयाचे काम लवकरच करण्यात येईल.’’  मयूर ढोरे, नगराध्यक्ष

 

Web Title: ba dcondition of lake who water supply to Wadgaon Maval city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.