पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 05:17 PM2020-04-02T17:17:14+5:302020-04-02T17:18:15+5:30

रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर

307 of suspects in Pimpri-Chinchwad corona report is negative; Waiting for 42 patient report | पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देचौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या परदेशी प्रवाशांची संख्या ४३६

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यत एकुण संशयितांची संख्या ३०७ असून ४२ घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तर रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी संशयितांची संख्या वाढत आहे.
महापालिकेच्या पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल केले आहेत. आज अखेर ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर बारा पॉझिटिव्ह रूग्णापैकी दहा जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. नव्याने ४२ रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या परदेशी प्रवाशांची संख्या ४३६ आहे.

Web Title: 307 of suspects in Pimpri-Chinchwad corona report is negative; Waiting for 42 patient report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.