WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:59 AM2020-06-22T10:59:11+5:302020-06-22T11:02:33+5:30

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला.

WWEचा सर्वात प्रामाणिक कर्मचारी म्हणून अंडरटेकर ओळखला जातो. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं.

55 वर्षीय अंडरटेकर तेव्हाचा सर्वात आघाडीचा कुस्तीपटू होता आणि त्यानं कारकिर्दीत अनेक जेतेपद जिंकली.

त्याच्या नावावर 7 जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं 2007मध्ये रॉयल रंम्बल आणि 12 वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे.

''निवृत्तीची हिच योग्य वेळ असल्याचे मला वाटतं. आता मोटरसायकलवर राईट करून भटकंती करायची आहे. WWEसोबत अनेक भावनिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत,''असे अंडरटेकर म्हणाला.

Wrestlemaniaमधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली.

त्यानंतर त्यानं पाच Wrestlemania सामन्यांत सहभाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. 2018च्या Wrestlemaniaसामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं.

दी डेडमॅन, दी अंडरटेकर आदी नावानं तो प्रसिद्घ होता. मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे.

अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या.