'मस्तराम' ते 'सेक्स लाइफ'पर्यंत! 'या' ७ वेब सीरिजमध्ये पार करण्यात आली बोल्डनेसची हद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:45 PM2021-10-19T18:45:00+5:302021-10-19T18:45:00+5:30

Web series: अॅमेझॉन प्राइम वर 'फोर मोर शॉट्स प्लीज' या सीरिजचे दोन सीजन रिलीज झाले आहेत.

गंदी बात - ऑल्ट बालाजीवर प्रचंड गाजलेली सीरिज म्हणजे गंदी बात. अलिकडेच या सीरिजचा ६ वा सीजन प्रदर्शित झाला. या सीजनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. या सीरिजमध्ये अनेक हॉट सीन दाखवण्यात आले असून यात बोल्डनेसच्या मर्यादा पार केल्याचं म्हटलं जातं.

सेक्स लाइफ - २५ जून २०२१ रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या पहिल्या एपिसोडला IMDB वर ५.३ रेटिंग मिळालं होतं.

रसभरी - स्वरा भास्करची मुख्य भूमिका असलेली रसभरीदेखील बोल्डनेसची हद्दपार करणाऱ्या सीरिजमध्येच गणली जाते. २०२० मध्ये ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. या सीरिजमुळे अनेकांनी स्वराला ट्रोल केलं होतं.

मस्तराम - एमएक्स प्लेअरवर ही सीरिज प्रदर्शित झाली असून ती प्रचंड चर्चेत आली.

एक्सएक्सएक्स - एक्सएक्सएक्स ही सीरिज ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित झाली असून एक कॉमेडी- इरॉटिक सीरिज आहे. या सीरिजचे दोन सीजन प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजमधील एका सीनमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला होता. ज्यामुळे तो सीन सीरिजमधून हटवण्यात आला.

फोर मोर शॉट्स प्लीज- अॅमेझॉन प्राइम वर 'फोर मोर शॉट्स प्लीज' या सीरिजचे दोन सीजन रिलीज झाले आहेत. या सीरिजमध्ये बोल्ड सीनचा भरणा करण्यात आला आहे.

देव डीडी - ऑल्ट बालाजीवर ही सीरिज प्रदर्शित झाली असून त्यात बोल्ड सीन जास्त प्रमाणात असल्याचं सांगण्यात येतं. या सीरिजच्या दुसऱ्या सीजनचं झी ५ वर प्रिमियर करण्यात आलं.