दक्षिण भारतातील 'या' शहरातील ऐतिहासिक वास्तूंना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:49 PM2020-01-29T17:49:59+5:302020-01-29T18:17:55+5:30

दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात एक सुंदर शहर आहे. जे शहर आपल्या पुरातन संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिध्द आहे. या शहराचे नाव वारंगल आहे

वारंगल या ठिकाणी पर्यटन स्थळांमध्ये सगळ्यात जास्त महत्वपूर्ण असा हा झरा आहे. भीमूनी पादम हा झरा वारंगल या शहारापासून जवळपास, ५० किलोमीटरच्या अंतरावर आहे.

वारंगल हा किल्ला ऐतिहासिक वास्तूमधला एक आहे. १३ व्या शतकात तयार झालेला हा किल्ला खूपच भक्कम आहे. पर्यटकांना पाहण्यासाठी हा किल्ला सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खूला असतो.

वारंगल या ठिकाणी पण मंदिरं आहेत पण जैन मंदिराचे आकर्षण पर्यटकांना खूप आहे. दगडांपासून हे मंदिर तयार करण्यात आले आहेत. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी ५ ते सायंकाळी ८ या वेळात खुले असते.

वारंगल शहारापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर एक ठिकाण आहे त्याचे नाव पाखल तलाव आहे. या हा तलाव खूप सुंदर आहे. जर तुम्ही तेलंगणाला जात असाल तर या ठिकाणी नक्की जा.

वारंगल या ठिकाणी एक मंदिर आहे. त्याला हजार खांबाचे मंदिर असं म्हणतात. तसंच वारंगल मधील हे मंदिर तेलंगणा राज्याची ओळख बनले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात. हननकोंटा या पर्वतावर हे मंदिर आहे. या ठिकाणी रुद्रेश्वर स्वामीची पूजा केली जाते. या ठिकाणी हत्ती आणि नंदी यांची चांगली प्रतिमा पहायला मिळते.