Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:49 IST2025-12-02T18:41:38+5:302025-12-02T18:49:46+5:30
थायलंडनंतर आता मलेशिया पर्यटकांची पहिली पसंती बनले आहे. लोकांना मलेशियाला भेट देणे खूप आवडत आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांसाठी येथे व्हिसा फ्री आहे.

२०२५ मध्ये सर्वाधिक पर्यटक मलेशियाला भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर थायलंड आणि तिसऱ्या क्रमांकावर व्हिएतनामचा समावेश आहे. मलेशियाला भेट देणे प्रत्येकाचे स्वप्न असू शकते, कारण हा एक अत्यंत सुंदर देश आहे.

इथे तुम्हाला उंच इमारती पाहण्याबरोबरच निळा समुद्र, पर्वत, स्वच्छ नदी, हिरवीगार जंगलं आणि उत्कृष्ट नाईट लाइफचा आनंद लुटता येतो. जर, तुम्ही नवीन वर्षात किंवा त्यानंतर मलेशियाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला एकूण खर्चाबद्दल काही माहिती देणार आहोत.

भारतीयांसाठी मलेशिया पूर्णपणे व्हिसा फ्री आहे आणि ही सुविधा केवळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच उपलब्ध आहे. भारतीय नागरिक पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक भेटीसाठी ३० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय आरामात प्रवास करू शकतात.

मात्र, या देशात प्रवेशासाठी काही नियम आहेत, जे पूर्ण करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट असावा. येण्या-जाण्याची कन्फर्म तिकीट असावी. बँक खात्यात पुरेसा बॅलन्स असावा. तुम्हाला मलेशिया डिजिटल अरायव्हल कार्ड ऑनलाइन भरावे लागेल. हे नियम पूर्ण केल्यावरच तुम्ही मलेशियात प्रवेश करू शकता.

मलेशियाला जाण्यासाठी दिल्ली, कोलकाता, बेंगळूरू, मुंबई येथून कुआलालंपूर विमानतळासाठी थेट विमानांची सोय आहे. एका व्यक्तीसाठी विमानाचा खर्च ₹२०,००० ते ₹२५०००च्या दरम्यान असू शकतो. बाकी, हे तुमच्या फ्लाइट आणि क्लासवर अवलंबून असते.

मलेशियामध्ये हॉस्टेल ₹३०००मध्ये उपलब्ध होतात, तर हॉटेल रूमचा खर्च ₹५००० पासून सुरू होतो. जर तुम्ही एकटे जात असाल, तर हॉस्टेल घेणे सर्वात चांगला आणि किफायतशीर पर्याय असू शकतो. हॉटेल थोडे महाग असू शकतात, हे सीजन आणि ठिकाणानुसार ठरते. हा देश फिरण्यासाठी तुम्ही किमान १.५ लाखाचे बजेट पुरेसे ठरू शकते.

मलेशियामध्ये फिरण्यासाठी खूप काही आहे. येथे तुम्ही अनेक ठिकाणे एक्सप्लोर करण्यासोबतच ॲक्टिव्हिटीजचाही आनंद घेऊ शकता. मलेशियात तुम्ही लंगकावी आयलँड, लंगकावी स्काय ब्रिज, तंजुंग रूह बीच, पानताई तेंगा बीच, दाताई बे, पानताई कोक बीच या ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग, जंपिंग आणि इतर ॲक्टिव्हिटीज करू शकता. तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान मलेशियाला भेट देऊ शकता.

















