उंचच उंच पर्वतांवर आहेत 'या' देशांच्या राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:32 PM2019-01-28T15:32:08+5:302019-01-28T15:37:50+5:30

La Paz, Bolivia- बोलिव्हियाची राजधानी ला पाज आहे. समुद्र सपाटीपासून ला पाज हे ठिकाण 11, 942 उंचीवर स्थित आहे. तिकडं तापमान कमी असलं तरी सौंदर्य पाहण्यासारखं आहे.

Quito, Ecuador - रिपब्लिक ऑफ इक्वाडोरच्या राजधानीचं नाव क्विटो आहे. ही राजधानीची उंच जगात दुसऱ्या नंबरला आहे. तसेच क्विटो हे शहर भूमध्य रेषेच्या जवळच वसलेलं आहे. या शहरातील ऐतिहासिक ठिकाणं, पार्क आणि कॅफे पर्यटकांना आकर्षित करतात.

Thimphu, Bhutan- भूतानची राजनाधी थिम्फू (Thimphu) आहे. ज्याची समुद्र सपाटीपासून उंची जवळपास 8,688 फूट आहे. चहूबाजूंनी डोगरांनी वेढलेला हे शहर सौंदर्याचा खजिना आहे. जगभरातून पर्यटक इथे येत असतात.

Bogota, Colombia- कोलंबिया हा देश दक्षिणी अमेरिकेमधल्या महाद्वीपाच्या उत्तर-पश्चिममध्ये वसलेलं आहे. या देशाच्या राजधानीचं नाव बोगोटा आहे. समुद्रापासून ते जवळपास 8612 फूट उंचावर स्थित आहे.

Addis Ababa, Ethiopia- इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा आहे. ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7726 फूट आहे. इथे एक समृद्ध संस्कृती आहे. या देशात फिरण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून उपस्थिती लावतात.