कार किंवा बाइक नव्हे, या ठिकाणी सायकलवरून फिरण्याची वेगळीच मज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:09 PM2019-06-03T16:09:48+5:302019-06-03T16:13:14+5:30

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे सायकलिंग करण्याचा मनमुराद अनुभव घेता येतो. बंगळुरूपासून नंदी हिलपर्यंत सायलिंगची मज्जा लुटू शकता. पावसाळ्यात या रस्त्यावर सायकलिंग करणं धोकादायक आहे. पण इतर मोसमात इथे सायकल चालवण्याचा वेगळाच थरार असतो.

मुंबईजवळ असलेल्या वीकेंड डेस्टिनेशनपैकी अलिबाग हे फारच सुंदर आहे. मुंबई ते अलिबागपर्यंत सायकलिंग करण्याची वेगळीच मज्जा आहे. समुद्रकिनारी मोकळीच मोकळी जागा आहे. इथल्या जागेत सायकल चालवण्याचं एक वेगळाच अनुभव असतो.

सिक्कीममधल्या कलिमपोंग ते जुलूकपर्यंत सायकलिंगचा थरार अनुभवता येतो. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 3078 मीटर उंचावर स्थित आहे. सायकलिंगसाठी हा रोड थोडा धोकादायक असला तरी बर्फामुळे इथे वारंवार बाधा पोहोचते. पण इथे सायकलिंग करण्याचा वेगळाच थरार असतो.

बोडमिला ते तवांगपर्यंत सायकलिंग करण्याची एक वेगळीच ऊर्मी आहे. इथे सायकलिंग करणं आव्हानात्मक असलं तरी तुमच्या सायकल चालवण्याच्या ऊर्जेवर सर्व निर्भर आहे.

सोमनाथपासून दीवपर्यंत सायकलिंग करण्याची एक वेगळीच अनुभूती आहे. माडाची झाडं आणि सुंदर समुद्र किनारा आपला प्रवास सुखकर बनवतो. इथे अनेक ठिकाणं फिरण्यासाठी बेस्ट आहेत.