जगातलं सगळ्यात मोठं रहस्यमय मंदिर माहीत आहे का? बघा कुठे आणि कसं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:39 PM2020-03-03T13:39:22+5:302020-03-03T14:23:31+5:30

तामिळनाडूनच्या तंजावरमध्ये बृहदीश्वर मंदिर आहे. या मंदिरासोबत अनेक रहस्यमय कथा जोडल्या आहेत. शास्त्रज्ञांसाठी आज सुद्धा हे मंदिर संशोधनाचा विषय ठरले आहे. या महादेवाच्या मंदिराला सगळ्यात मोठया मंदिराचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला आहे.

प्राचीन भारताच्या शिल्पकलेसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. १९८७ मध्ये या मंदिराला युनेस्कोद्वारे हेरिटेज वास्तु घोषित करण्यात आले होते. मुगल शासनकर्त्यांनी हे मंदिर तोडल्यानंतरही हे ऐतिहासिक मंदिर भारताच्या प्राचीन वास्तुकलेचे जिवंत उदाहरण म्हणून टिकून राहिले. या मंदिराच्या आश्चर्यकारक फॅक्टसबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

हे मंदिर फक्त विशाल अशा दगडांनी तयार झालं आहे. या मंदिराचा घुमट अशाप्रकारे डिजाईन करण्यात आला आहे जेणेकरून सुर्याची किरणं या मंदिराच्या चारही बाजूंवर पडतील. पण तुम्हाला माहित आहे का या मंदिराच्या घुमटाची सावली कधीच जमीनीवर पडत नाही. दुपारच्यावेळी मंदिराची सावली खाली जमिनीवर दिसते पण घुमटांची दिसत नाही.

या ऐतिहासिक मंदिराचं घुमट ८८ टनच्या दगडांनी बनवलं आहे. त्यावर सोन्याचा कळस सुद्धा ठेवला आहे. वैज्ञानिकांना हा प्रश्न पडतो की त्या काळात इतक्या जास्त वजनाचे दगड कसे घुमटावर नेण्यात आले. कारण त्या काळात क्रेन सुद्धा नव्हती.

हे मंदिर तयार करण्यासाठी जराही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. हे मंदिर तयार करण्यासाठी १३०००००० टन ग्रेनाईटचा वापर करण्यात आला होता. दगडांना एकमेकांमध्ये इंटरलॉक करून हे मंदिर तयार करण्यात आलं आहे. चुना किंवा सिमेंटचा जराही वापर करण्यात आलेला नाही.

या मंदिराच्या घुमटांना केशरी रंग लावण्यात आला आहे. या मंदिराची पिरॅंमिडप्रमाणे महाकाय रचना आहे. या मंदिराची उंची ६६ मीटर म्हणजेच २१६ फुट आहे. जगातल्या सगळ्यात उंच मंदिरांमध्ये या मंदिराची गणना होते.

या मंदिराच्या आत एक विशाल अशी नंदीची मुर्ती आहे. ही मुर्ती खास दगडाला तासून तयार करण्यात आली आहे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला विशालकाय शिंवलिंगाचे दर्शन घडून येईल.

या मंदिरात अनेक शिलालेख आहेत. संस्कृतात श्लोक सुद्धा लिहिलेले दिसून येतात.

(image credit- Quora, india.com, dhruvigohil)