भारत आणि चीनच्या सीमेवरील रहस्यमय ठिकाण 'शांगरीला व्हॅली', याच्या आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:38 PM2020-03-10T15:38:44+5:302020-03-10T16:10:10+5:30

प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक आणि अभ्यासक अरूण कुमार शर्माने आपल्या पुस्तकात तिबेटच्या त्या रहस्यमय जागेचा विस्ताराने उल्लेख केला आहे.

भारत आणि चीनच्या सीमेवर एक फारच रहस्यमय परिसर आहे. याला शांघरीला घाटी असं नाव आहे. हा भाग तिबेट आणि अरूणाचल प्रदेशाच्या मधे आहे. अनेक लोक या भागाचा रहस्यमय घाटी म्हणून उल्लेख केला आहे. तंत्र-मंत्राच्या या भागाचा विशेष उल्लेख केला गेला आहे. पद्म विभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित डॉ. गोपीनाथ कविराज यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख याचा उल्लेख करण्यात आलाय. या भागाला बरमुडा ट्राएंगलप्रमाणे जगातली सर्वात रहस्यमय जागा मानली जाते. (सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक आणि अभ्यासक अरूण कुमार शर्माने आपल्या पुस्तकात तिबेटच्या त्या रहस्यमय जागेचा विस्ताराने उल्लेख केला आहे. त्यांच्यानुसार, जगात अशी काही ठिकाणं आहेत जी भू-हीनता आणि वायु-शून्यता असलेली आहेत. हे ठिकाण वायुमंडलाने प्रभावित आहे. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

असे मानले जाते की, या ठिकाणावर जाऊन वस्तू किंवा व्यक्तीचं अस्तित्व जगातून गायब होतं. अशाच ठिकाणांमध्ये शांगरीला या भागाचा समावेश होतो. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

'शांगरीला घाटी' ला बरमुडा ट्राएंगलसारखं मानलं जातं. बरमुडा ट्राएंगल असं ठिकाण आहे जिथे अनेक जहाजं आणि विमानं गायब झाली आहेत. हे ठिकाण भू-हीनता क्षेत्रात येतं. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

असे मानले जाते की, चीनच्या सेनेने अनेकदा हे ठिकाणाचा शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. तिबेटीयन विद्वान युत्सुंग यांच्यानुसार, या भागाचा संबंध अंतराळातील लोकांशी आहे. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

तिबेटीयन भाषेतील 'काल विज्ञान' या पुस्तकात या भागाचा उल्लेख मिळतो. ज्यात लिहिले आहे की, जगातली प्रत्येक गोष्ट ही देश, काळ आणि निमित्ताशी जोडली गेली आहे. पण या भागात काळ म्हणजे वेळेचा प्रभाव होत नाही. इथे प्राण, मनाच्या विचाराची शक्ती, शारीरिक क्षमता आणि मानसिक चेतना फार जास्त वाढते. (Image Credit : in.pinterest.com)

या ठिकाणाला पृथ्वीवरील आध्यात्मिक नियंत्रण केंद्रही म्हटलं जातं. भारतासोबतच परदेशातही हा भाग प्रसिद्ध आहे. युत्सुंग स्वत: तिथे गेल्याचा दावा करतात. त्यांच्यानुसार, तिथे ना सूर्याचा प्रकाश होता ना चंद्राचा.वातावरणात चारही बाजूने पांढरा प्रकाश होता. सोबतच विचित्र शांतता. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

युत्सुंगने वाराणसीतील तंत्र विद्वान अरूण शर्मा यांना सांगितले की, तिथे एका बाजूला मठ, आश्रम, वेगवेगळ्या डिझाइनची मंदिरे आणि दुरसीकडे मोकळं मैदान होतं. येथील तीन साधना केंद्र प्रसिद्ध आहेत. पहिलं ज्ञानगंज मठ, दुसरं सिद्ध विज्ञान आश्रम आणि तिसरं योग सिद्धाश्रम. (सांकेतिक फोटो)

'शांगरीला घाटी'ला सिद्धाश्रम असेही म्हटले जाते. सिद्धाश्रमाचा उल्लेख महाभारत, वाल्मिकी रामायण आणि वेदांमध्येही आहे. सिद्धाश्रमचा उल्लेख काल विज्ञान पुस्तकात तसेच इंग्रजी लेखक James hilton यांच्या lost Horizon मध्येही आढळतो. सांकेतिक फोटो) (Image Credit : Social Media)

जेम्स हिल्टनने त्यांचं पुस्तक lost Horizon मध्ये या ठिकाणाबाबत लिहिले आहे की, इथे लोक शेकडो वर्ष जिवंत राहतात. हे पुस्तक वाचून अनेक संशोधकांनी या ठिकाणाबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. यातील लोक नेहमीसाठी गायब झाले. असे मानले जाते की, चीनची एका लामाच्या या ठिकाणी पोहोचली होते. पण तरी त्यांना या ठिकाणाबाबत काही कळाले नाही. (Image Credit : kjkoukas.wordpress.com) (सांकेतिक छायाचित्र)