जागतिक महिला दिन :खूशखबर! महिला दिनानिमित्त आज 'या' ठिकाणांवर महिलांना प्रवेश फ्री.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 09:50 AM2020-03-08T09:50:01+5:302020-03-08T10:26:17+5:30

International World Women's Day

आज ८ मार्च जागतीक महिला दिन आहे. आज आम्ही तुम्हाला महिला दिनानिमित्त एक खास गोष्ट सांगणार आहोत. जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल किंवा जाणार असाल तर महिला पर्यटकांकडून कोणतंही प्रवेश शुल्क घेतलं जाणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तुम्हाला या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही महाराष्ट्रामधील घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. मुंबई दर्शनमधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ. या ठिकाणी सुद्धा महिलांना प्रवेश मोफत आहे.

स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असं ओडिशातील कोणार्क मंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे. या मंदिराच महिलांना प्रवेश फ्री आहे.

कुतुबुद्दीन ऐबकाने मोहंमद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केलं. या शानदार विजयाचे प्रतीक म्हणून कुतुब मिनार बांधण्यात आला. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतूब मिनार असे संबोधले जाते.

प्रेमाचं प्रतीक समजलं जाणारं ताजमहाल प्रत्येकाला पहायचाच असतो. आज या ठिकाणी महिलांना प्रवेश मोफत देण्यात येईल.

औरंगाबाद जिल्हयातल्या अजिंठा, वेरूळ या लेण्यांचं. पर्यटकांचं खास आकर्षण असलेल्या या लेण्या अभ्यासकांनाही चकित करणा-या आहेत. या ठिकाणाची सफर करण्यासाठी जर तुम्ही आज जात असाल तर प्रवेश फ्री आहे.

मुघल बादशाहा हुमायूँ यांचे थडगे आहे. हा मकबरा पाहूनच नंतर ताजमहल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर इराणी वास्तूकलेची छाप आहे.

दिल्लीची शान असलेला लाल किल्ला पाहायला जगभरातून पर्यटक येतात. जगातील भव्यदिव्य राजवाड्यांपैकी एक आहे. या ठिकाणी आज महिलांना प्रवेश घेण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

(image credit-flickr)