वाघ आणि हत्तीची कुत्र्यासोबत मैैत्री? विविध प्रकारच्या प्राण्यांचे प्रेम आणि मैत्री पाहून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 05:13 PM2020-02-06T17:13:58+5:302020-02-06T17:36:08+5:30

सारख्या प्रजातीचे प्राणी एकमेकांचे मित्र असतात. हे तुम्हाला माहित असेल पण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा एकमेकांचे मित्र असतात. हे फोटो पाहून तुमचं मन नक्कीच भरून येईल

वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांना खेळताना आणि आनंदात बघून तुम्हाला प्राण्यांबद्दल खूपच जिव्हाळा वाटेल.

एका विशिष्ट पध्दतीचे जीवन जगणारे लोक इतर जातीच्या किंवा समुहाच्या लोकांशी मैत्री करताना अनेकवेळा विचार करतात. पण प्राण्याचे हे फोटो पाहून तुम्हाला त्यांच्यातील या गुणाचे सुद्धा दर्शन होईल.

अनेक रिसर्चमध्ये स्पष्ट झाले आहे की प्राण्यांमध्ये सुद्धा माणसांप्रमाणे मैत्री असते. हे फोटे पाहिल्यानंतर तुम्हाला प्राण्याच्या मैत्रीचे दृश्य पाहता येईल.

प्राण्यांचे असे रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते.

कासवाला जीव लावताना गाय दिसून येत आहेे. या गाईच्या डोळ्यात कासवाबद्दल माया दिसून येत आहे.

कुत्र्याच्या अंगावर चक्क मांजर झोपली आहे.