'ही' आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेली जगातील सर्वोत्तम ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:35 PM2018-08-27T15:35:22+5:302018-08-27T15:38:17+5:30

आइसलँड: निसर्गाचे सर्व आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतात. हिमकडे, उष्ण झरे, ज्वालामुखी, धबधबे असं निसर्ग सौंदर्य आइसलँडमध्ये बघायला मिळतं.

गिझा: स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं. येथील पिरॅमिड्सचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये होतो.

बार्सिलोना: हे ठिकाण पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. सोनेरी वाळूचे किनारे, हेरिटेज दर्जाच्या वास्तू, स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना असलेली चर्च यामुळे बार्सिलोनाला दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करतात.

पॅरिस: प्रेमाचं शहर अशी पॅरिसची ख्याती आहे. पॅरिस शहर फिरणं म्हणजे जणू काही एखाद्या म्युझियमची सैर करणं. आयफेल टॉवरसह उत्तम स्थापत्यशास्त्र असलेल्या अनेक वास्तू या शहरात आहेत.

काठमांडू: भारताचा शेजारी असलेला आणि हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे. काठमांडूमधील अनेक प्राचीन मंदिरं पाहण्यासारखी आहेत.