'या' देशात जाण्यासाठी भारतीयांना लागत नाही व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:16 PM2018-07-27T17:16:20+5:302018-07-27T17:24:24+5:30

कामासाठी अथवा विरंगुळा म्हणून तुम्ही जर परदेशात जाण्याचा बेत आखत असाल तर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो त्यासाठी लागणाऱ्या व्हिसाचा. मात्र असे काही देश आहेत ज्या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही. हे देश नेमके कोणते ते जाणून घेऊया.

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. तसेच जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे.

भूतान हा दक्षिण आशियातील एक सुंदर देश असून तो चीन आणि भारताच्या मधोमध वसलेला आहे. भूतानमधील महत्वाची ठिकाणं पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जात असतात.

डोमिनिका हा निसर्गाने नटलेला अत्यंत सुंदर देश आहे. येथील सुंदर धबधबे आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतात.

ग्रेनाडा हा छोट्या छोट्या बेटांचा एक सुंदर देश आहे. सेंट जॉर्ज ही ग्रेनाडाची राजधानी आहे.

मॉरिशस हा हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. मॉरिशसमध्ये आशिया, युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.

फिजी, त्रिनिनाद अँड टोबॅगो, टांझानिया या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही.