इथल्या तापमानाचा आकडा पाहूनच गारठून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:31 PM2019-05-14T17:31:24+5:302019-05-14T17:51:16+5:30

ओयम्यकॉन, रशिया- रशियातल्या सैबेरियातलं हे गाव आर्टिक सर्कलजवळ आहे. इथलं तापमान उणे 50 अंश सेल्सिअस इतकं आहे.

वर्खोयान्स्क, रशिया- सैबेरियातल्या या गावातलं तापमानही उणे 50 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं.

स्नॅग, कॅनडा- युकून शहराजवळ अलास्का हायवेजवळ असणाऱ्या या गावातलं कायम शून्याच्या खाली असतं. इथलं लोक हिवाळ्यात घराबाहेरदेखील पडत नाहीत.

उलानबाटार, मंगोलिया- मंगोलियाच्या राजधानीचं शहर असलेल्या उलानबाटारमध्ये 2015 मध्ये उणे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

अस्ताना, कझाकस्तान- हिवाळ्यात अस्तानातलं तापमान उणे 30 ते उणे 35 अंशांपर्यंत घसरतं. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान अस्तानातली नदीदेखील गोठते.

हर्बिन, चीन- आईस सिटी अशी हर्बिनची ओळख आहे. या ठिकाणचा विंटर फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. इथलं तापमान कायम उणे 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं.

यलोनाइफ, कॅनडा- हे कॅनडातलं सर्वात कमी तापमान असलेलं शहर आहे. जानेवारीत इथला पारा उणे 44 अंशांपर्यंत घसरतो.