उत्तराखंडमधील 'या' पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:36 PM2020-04-16T21:36:40+5:302020-04-16T22:05:43+5:30

उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखले जाते. याशिवाय येथील हिमालय, नदी, धबधबे आणि तलाव पाहिल्यानंतर लक्षात येते की, याठिकाणी निसर्गाची देणगी लाभलेली आहे. धार्मिकदृष्टीने पाहिले तर केदारनाथ, बद्रिनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री उत्तराखंडमध्ये आहे. याशिवाय, उत्तराखंडमधील पर्यटन स्थळे जगभरात प्रसिद्ध आहेत. चला तर मग पाहूया, ही पर्यटन स्थळे...

मुक्तेश्वर - नद्यांचे शहर नैनितालपासून ४६ किलोमीटर अंतरावर मुक्तेश्वर आहे. हिवाळ्यात याठिकाणी बर्फाचा वर्षाव होत असतो. हे दृष्य नयनरम्य असते.

देवप्रयाग - देवप्रयाग समुद्रापासून ८३० मीटरच्या उंचावर आहे. तर ऋषिकेशपासून देवप्रयागचे अंतर जवळपास ७० किलोमीटर इतके आहे. देवप्रयाग उत्तराखंडमधील पाच प्रयोगांपैकी एक आहे. असे मानले जाते की, राजा भागीरथने माता गंगेला पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले, त्यावेळी ३३ कोटी देवी-देवतांसह गंगा स्वर्गातून देवप्रयागमध्ये अवतरली होती. याठिकाणीच भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. येथील दृष्य पाहण्यासारखे आहे.

तपोवन - तपोवन गंगोत्री हिमनदीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. तपोवन येथून हिमालय पर्वताच्या रांगा दिसतात. तपोवनला सुद्धा नंदनवन म्हटले जाते. गोमुख ट्रॅकिंगजवळच तपोवन आहे. तसेच, याठिकाणी देवदारची झाडे मोठ्याप्रमाणात आहेत.

औली - उत्तराखंडमधील औलीला भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. येथील नैसर्गिक वातावरण पाहण्यासारखे असते. तसेच, येथील निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी भेट देतात.