कधीही न पाहिलेल्या पक्ष्यांचे सौंदर्य पाहाल तर हरवून जाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 06:06 PM2020-01-11T18:06:28+5:302020-01-11T18:20:28+5:30

तुम्हाला जर कुठे फिरायला जावसं वाटतं असेल तर तुम्ही हिवाळ्यात तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी जाता येईल. हिवाळ्यात भारतात अनेक परदेशी पक्षी येत असतात.

काही महिने थांबून वातावरणात बदल झाल्यानंतर पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी निघून जातात.

राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी बर्डसेन्चुरी आहे. या ठिकाणी तुम्ही ३० जानेवारीपर्यंत फिरू शकता आणि परदेशी पक्षांना पाहण्याचा आनंद घेऊ शकता

दुर्मिळ, रंगेबेरंगी पक्षी या ठिकाणी आले आहेत.

येथे तुम्ही साईबेरियाई सारस, घोमरा, जलपक्षी, लालसर बत्तख, उत्तरी शाह चकवा हे पक्षी पाहू शकता.

या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफीचा आनंद घेता येईल, मनमोहक नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहाता येणार आहे.

भरतपुर बर्ड सेंक्चुरीला केवलादेव राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे नाव महादेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

या ठिकाणी राहण्यासाठी रूम्स उपलब्ध आहेत. वाहतुकीची सोय सुद्धा उत्तम आहे.