'ही' आहेत आशियातील स्वप्नवत बेटं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:54 PM2019-01-22T16:54:31+5:302019-01-22T17:10:55+5:30

धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा, विश्रांतीसाठी सहलीचे बेत आखले जातात. आशियामध्ये निसर्ग सौदर्यांनी नटलेली अनेक सुंदर बेटं आहेत. 2019 मध्ये फिरण्याचा विचार असेल तर आशियातील शांत बेटांना नक्की भेट द्या. अशाच काही सुंदर बेटांविषयी जाणून घेऊया.

थायलंडमधील फुकेट हा दक्षिण प्रांत आहे. आशियातील हे सर्वात मोठे बेट असून या सोबत 32 छोटी बेटं आहेत. या बेटावर ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येतो. तसेच क्रुजची सफर करता येते.

फिलिपाईन्समध्ये पालावान हे बेट आहे. मनमोहक निसर्ग सौंदर्यामुळे पालावानला आशियाचा स्वर्ग म्हटलं जाते. पालावान शांत आणि सुंदर बेट असल्याने अनेक पर्यटक तेथे भेट देत असतात.

इंडोनेशियातील बाली हे बेट सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. जगभरातील लाखो पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या बेटावर नक्की येतात. समुद्रासोबतच या ठिकाणी प्राचीन मंदिरं आणि महाल पाहण्याची ही संधी मिळते.

मलेशियातील पश्चिम तटावर लांगकावी हा 99 बेटांचा एक समूह आहे. जे चहुबाजूंनी निळ्याशार समुद्रांनी वेढलेलं आहे. या बेटावर विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

म्यानमारमधील मॅकलेड हे बेट अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र या ठिकाणी केवळ एकच रिसॉर्ट असल्याने येथे जाण्याच्या प्लॅन असेल तर आधीच बुकींग करणं गरजेचं आहे.

मलेशियातील पोम पोम बेट हे तेथील निसर्ग सौदर्यामुळे अत्यंत प्रसिद्ध बेट आहे. शांत वातावरणात सुट्टीचा आनंद घ्यायचा असल्यास या बेटाचा नक्की विचार करा.

कंबोडियातील कोह रोंग हे बेट शांत वातावरण, समुद्र आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या निमित्ताने फिरण्याचा बेत असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

व्हिएतनाममधील कॅट बा हे अत्यंत सुंदर बेट आहे. फिरण्यासोबतच ट्रेकिंग आणि इतर अनेक साहसी खेळांचा आनंद घेता येतो. तसेच सीटी बा नॅशनल फिरण्याची देखील संधी मिळते.