ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:38 AM2018-03-22T10:38:25+5:302018-03-22T10:38:25+5:30

घोडबंदर रोडवर गुरुवारी (22 मार्च) सकाळी ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

कंटेनरमधील तेल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ हा ऑइल कंटेनर उलटला.

या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला.

अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर कंटेनर हटवण्याचं काम सुरू केले होते.