ठाण्यात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, भाजपाची काढली प्रतीकात्मक तिरडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 03:58 PM2018-05-22T15:58:35+5:302018-05-22T15:58:35+5:30

कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे.

मंगळवारी सुमारे 85 रुपये पैसे पेट्रोलचा तर 73 रुपये डिझेलचा दर झाला आहे.

याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘तिरडी आंदोलन’ केले.

तिरडीवर दुचाकीला झोपवून चक्क भाजपा सरकारचे मडके फोडले.

कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरू असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे.