अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला सुरुवात, पाहा क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:17 AM2018-06-13T11:17:13+5:302018-06-13T11:17:44+5:30

98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनचा पहिला कार्यक्रम पार पडला . अशोक हांडेच्या मराठी बाणा ह्या लोकप्रिय कार्यक्रमाने ह्या नाट्यसंमेलनाची सुरवात झाली.

संमेलन मुलुंडमध्ये होत असल्याने नाट्यसंमेलनातील पहिल्या कार्यक्रमाचा मान ही स्थानिक म्हणून अशोक हांडेना देण्यात आला.

कालिदास नाट्यमंदिरात झालेल्या या शुभारभांच्या कार्यक्रमाला रसिकांनीही गर्दी केली होती.

दुपारी 4 वाजता मुलुंड स्टेशन जवळील हनुमान मंदिरापासून नाट्यदिंडीला सुरवात होणार आहे.

आज संध्याकाळी साडे सहा वाजता 98 व्या नाट्यसंमेलनाचं उदघाटन होणार आहे