Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:11 PM2020-03-28T14:11:17+5:302020-03-28T14:18:22+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंसाठी अनेक क्रीडापटू, सेलिब्रेटी धावून येताना पाहायला मिळत आहेत.

ब्रिस्टॉल येथील 21 वर्षीय टेनिसपटून कॅटी स्वान हीनंही पुढाकार घेऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. कनास येथील विचिटा येथील 70 कुटुंबीयांचे ती आणि तिची आई निकी पोट भरत आहेत.

कॅटी आणि तिच्या आईनं त्यांच्या घरातील गॅरेजचं सुपरमार्केटमध्ये रुपांतर केले आहे आणि त्यात त्यांनी खाण्याचं पॅकेज ठेवले आहेत. दररोज त्या दोघी गरजूंना हे अन्न पुरवत आहेत.

ब्रिटनच्या या खेळाडूनं फेड चषक टेनिस स्पर्धेत संघाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे तिला फेड कप स्टार असे संबोंधले जाते.

ती म्हणाली,''माझी आई 'Big Brother Big Sisters' या चॅरीटीसाठी काम करते. ही चॅरीटी गरीब विद्यार्थी किंवा आर्थिक दुर्लब कुटुंबांना सहकार्य करण्याचं काम करते.''

कॅटी या समाजकार्यात आता आईच्या मदतीला पुढे आली आहे. तिनं फेसबूकवरून निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे.

फेसबुकवर तिनं केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तिनं 4 हजार डॉलर इतका निधी गोळा केला आहे.

''माझा भाऊ आणि मी जेवणाचे पॅकेज गरजू लोकांपर्यंत पोहचवतो. माझ्या भावाच्या शाळेतील काही मुलंही आम्हाला मदत करतात,'' असे कॅटीनं सांगितले.

कॅटी ही जागतिक क्रमवारीत 256 व्या स्थानावर आहे.

तिच्या या समाजकार्याचे ब्रिटनमध्ये कौतुक होत आहे.