Australia Openच्या कोर्टवर अवतरली अप्सरा; बिकनी मॉडल Camila Giorgiला पाहून चाहत्यांचा 'जीव झाला येडापीसा', पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:47 PM2022-01-22T15:47:07+5:302022-01-22T15:51:13+5:30

ऑस्ट्रेलिया ओपन २०२२ स्पर्धेत इटलीच्या कॅमिला जॉर्जी ( Camila Giorgi) या खेळाडूनं हवा केली आहे.

ऑस्ट्रेलिया ओपन २०२२ स्पर्धेत इटलीच्या कॅमिला जॉर्जी ( Camila Giorgi) या खेळाडूनं हवा केली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अॅशलेघ बार्टीकडून तिचा पराभव झाला असला तरी सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.

३० वर्षीय कॅमिला ही इटलीत राहणारी आहे. इथे ती ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्याच्या इराद्यानं आली होती, परंतु तिनं टेनिस प्रेमींचं हृदय जिंकले. बार्टीनं तिला ६-२, ६-३ असे सहज पराभूत केले.

Camila Giorgi ही एक बिकनी मॉडल आहे आणि ती इटलीत खूप प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत ती चौथ्यांदा तिसऱ्या फेरीतून पराभूत होऊन माघारी परतली आहे.

तिनं २०१८मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत कॅमिला ३४व्या क्रमांकावर आहे आणि सोशल मीडियावर तिच्या फोटोंना प्रचंड मागणी आहे. तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

३० डिसेंबर १९९१ मध्ये इटलीत तिचा जन्म झाला. क्लाऊडीया जॉर्जी या फॅशन डिझायनरची ती मुलगी आहे. तिच्या प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे क्लाऊडीया तयार करते.