सानिया इतकीच सुंदर दिसते तिची बहीण, होणार अझरुद्दीनची सून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:23 PM2019-10-08T13:23:35+5:302019-10-08T13:26:51+5:30

सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहे.

असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात अनम आणि असद लग्न करणार आहेत.

लग्नापूर्वी सानिया आणि अनम मैत्रीणींसह नुकतेच पॅरीसमधून बॅचलर पार्टी करून परत आले

पहिला पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे.

18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता.