‘देवमाणूस’ मालिकेतील हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके मानधन, जाणून घ्या त्यांची खरी नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 02:01 PM2021-08-01T14:01:04+5:302021-08-01T14:12:13+5:30

Devmanus : ‘देवमाणूस’ मालिका आली आणि अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील कलाकारही चर्चेत आलेत. पण या कलाकारांचे खरे नाव काय आहे, त्यांना किती मानधन मिळते हे तुम्हाला माहितीये का?

देवमाणूस मालिकेतील अजित कुमार देवची मुख्य भूमिका साकारणा-या कलाकाराचे नाव किरण गायकवाड आहे. याआधी ‘लागीर झालं जी’ या मालिकेत तुम्ही त्याला पाहिलं असेलच. किरण गायकवाड मालिकेच्या एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळते.

मालिकेतील सरू आजी तर तुमच्या ओळखीच्या असतीलच. रूक्मिणी सुतार या 75 वर्षांच्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली आहे. त्या प्रत्येक एपिसोडसाठी 15 हजार रूपये घेतात.

एसीपी दिव्या सिंह हिची भूमिकाही चांगली गाजली. ही भूमिका नेहा खान हिने केली आहे.शिकारी, बॅड गर्ल, काळे धंदे, गुरूकुल अशा अनेक सिनेमात झळकलेली नेहा एका भागासाठी जवळपास अठरा हजार रुपये मानधन घेते.

काही दिवसांपूर्वीच देवमाणूस मालिकेत आर्या या नवीन पात्राची एन्ट्री झाली होती. ही भूमिका सोनाली पाटील या अभिनेत्रीने साकारली आहे. सोनाली पाटील मालिकेच्या एका भागासाठी 16 हजार रुपये मानधन घेत असल्याचे समजते.

अगदी अलीकडे देवमाणूस या मालिकेत चंदा हे नवे पात्र दिसले. सध्या चंदाची सर्वत्र चर्चा आहे. ही भूमिका माधुरी पवार या अभिनेत्रीने केली आहे. माधुरी पवार ही टिक टॉक स्टार होती. आता ती अभिनय क्षेत्रात आली आहे. तिला एका एपिसोडसाठी 14 हजार रुपये मिळतात.

देवमाणूस मालिकेतील डिम्पलचे खरे नाव अस्मिता देशमुख हिने साकारली आहे. ती एका भागासाठी तब्बल 17 हजार रुपये आकारते.

मालिकेतील टोण्या या बालकलाकाराचा भावही कमी नाही. विरळ माने हा या मालिकेत टोण्याच्या भूमिकेत आहे. तो एका भागासाठी 10 हजार रुपये आकारतो, असे कळते.

बज्या ही भूमिका किरण डांगे याने साकारली आहे. किरण डांगे या मालिकेतील एका भागासाठी 11 हजार रुपये मानधन येतो.

मंगलची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली जोगळेकर ही प्रत्येक एपिसोडसाठी 12 हजार रूपये घेत असल्याचे कळते.