‘मन झालं बाजिंद’ या नव्या मालिकेतील ती आहे तरी कोण? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:21 PM2021-07-30T17:21:11+5:302021-08-18T16:04:41+5:30

झी मराठीवर एक नवी मालिका लवकरच येतेय. मन झालं बाजिंद असं या मालिकेचं नाव आहे. या नव्या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण दिसणार आहे.

झी मराठीवर एक नवी मालिका लवकरच येतेय आणि या मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मन झालं बाजिंद असं या मालिकेचं नाव आहे.

या नव्या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण दिसणार आहे. राया आणि कृष्णाची ही प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेत रायाची भूमिका साकारली आहे ती अभिनेता वैभव चव्हाणनं आणि कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे ती अभिनेत्री श्वेता राजन.

या श्वेता राजनला तुम्ही ओळखत असालच. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील अज्या अर्थात नितीश चव्हाणसोबतच्या डान्स व्हिडीओत ती नेहमीच दिसते.

नितीश सोशल मीडियावरच्या अनेक व्हिडीओत एका तरूणीसोबत कपल डान्स करताना दिसतोय. हीच ती श्वेता राजन खरात.

‘राजा राणीची गं जोडी’या मालिकेत संजीवनीची बेस्ट फ्रेण्ड अर्थात मोनाच्या रूपातही तुम्ही तिला पाहिलं असेल.

हिचं श्वेता राजन खरात आता ‘मन झालं बाजिंद’ या नव्या को-या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

श्वेता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. श्वेता राजन असं हँडल नेम तिनं ठेवलं आहे.

श्वेतानं ‘घेतला वसा टाकू नको’ मालिकेतील भगवान शंकराच्या पौराणिक कथेत महालक्ष्मीची भूमिका केली होती.

मुळची साता-याची श्वेता उत्तम डान्सर आहे. ख-या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरसही आहे.