‘अनुराधा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:00 AM2022-06-24T08:00:00+5:302022-06-24T08:00:02+5:30

Snehalata Vasaikar photoshoot : कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. तिचं नाव स्रेहलता वसईकर...

कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. तिचं नाव स्रेहलता वसईकर.

स्रेहलता वसईकर ही एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री. विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत तिने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली.

ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या कलाकारांना पारंपरिक लुकमध्ये पाहण्यास प्रेक्षकांचे डोळे सरावले असतात. पण त्यापलीकडे कलाकारांचं एक आयुष्य असतं आणि खऱ्या आयुष्यात स्रेहलता प्रचंड बोल्ड आहे.

सध्या तिच्या अशाच बोल्ड, ग्लॅमरस फोटोशूटची चचर्स आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. स्रेहलताने हे फोटो शेअर केले आहेत. स्रेहलताच्या या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. फायर है फायर, पाणी में आग लगा दी, लयभारी अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत.

स्रेहलता सोशल मीडियावर सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. पण स्नेहलताला यामुळे फरक पडत नाही. मी एक कलाकार आहे आणि माझं एक खासगी आयुष्य सुद्धा आहे... मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते ..., अशी तिची भूमिका आहे आणि त्यामुळे जग काय म्हणेल याची तिला अजिबात पर्वा नाही.

स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.

काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय काही शोचे सूत्रसंचालन केलं होतं.