'रामायण'मधील सीतेचा रिअल लाईफ राम पाहिलाय का? दीपिका चिखलियाने शेअर केले पतीसोबत रोमॅण्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:15 PM2021-11-24T14:15:00+5:302021-11-24T14:15:00+5:30

Dipika chikhlia: काही दिवसांपूर्वीच दीपिका यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्यांनी नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

रामानंद सागर यांची तुफान गाजलेली पौराणिक मालिका म्हणजे 'रामायण'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं आज प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान असल्याचं पाहायला मिळतं.

रामायण या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असून अनेक जण सीता याच नावाने त्यांना हाक मारतात.

रामायण या मालिकेनंतर दीपिका यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं. मात्र, त्यांची सीतेची भूमिका अजरामर झाल्याचं पाहायला मिळतं.

लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना रामायण पाहण्याची संधी मिळाली. तेव्हापासून दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

कलाविश्वाप्रमाणेच सध्या दीपिका सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

अलिकडेच दीपिका यांनी त्यांच्या रिअल लाइफ रामासोबत म्हणजे त्यांच्या पतीसोबत फोटो शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच दीपिका यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्यांनी नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

दीपिका यांच्या पतीचं नाव हेमंत टोपीवाला असं असून २२ नोव्हेंबर १९९१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

दीपिका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या प्रचंड रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत. दरम्यान, दीपिका यांचे फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी या जोडीला रॉकिंग कपल म्हटलं आहे.

Read in English