चिंकी व मिंकीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 06:00 PM2021-01-19T18:00:24+5:302021-01-19T18:06:21+5:30

कोण आहेत चिंकी-मिंकी?

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसलेल्या सुरभी व समुद्धी या जुळ्या बहिणींना आपण चिंकी व मिंकी या नावाने ओळखतो.

सध्या या चिंकी व मिंकीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चिंकी व मिंकी त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखल्या जातात. दोघीही बहीणी अगदी हुबेहुब सेम टू सेम दिसतात.

या दोघांच्या बोलण्याचा अंदाजही सारखा आहे. दोघींना एकत्र पाहिल्यावर कोण चिंकी अन् कोण मिंकी हे ओळखता येत नाही.

कपिल शर्मा शोमध्ये दिसल्यानंतर दोघींची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. दोघींच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली आहे.

चिंकी-मिंकी दोघी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत.

स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ दोघीही शेअर करतात.

इन्स्टावर चिंकी व मिंकीला 53 हजारांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.

दोघींचा बोल्ड अंदाज आणि त्यांच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत.

चिंकी-मिंकीने फोटो शेअर केला रे केला की तो लगेच व्हायरल होतो.