धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:48 PM2021-12-05T18:48:38+5:302021-12-05T18:54:04+5:30

Dhanshri kadgaonkar: धनश्री आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. सध्या धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिच्या नावाची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

धनश्री आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. सध्या धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिच्या नावाची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते.

काही महिन्यांपूर्वीच धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून सध्या ती बाळाच्या संगोपनात व्यस्त आहे. त्यामुळेच तिने कलाविश्वातील वावर सध्या कमी केला आहे.

अलिकडेच धनश्री 'घेतला वसा टाकू नको' या मालिकेत झळकली होती.या मालिकेत तिने छोटेखानी भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली धनश्री तिच्या बाळासोबत क्वालिटी टाइम व्यतीत करत असून अलिकडेच ती तिच्या कुटुंबासोबत व्हेकेशनवर गेली आहे.

धनश्रीने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली धनश्री कायम तिच्या बाळासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

धनश्री तिच्या पती आणि चिमुकल्या बाळासोबत गणपती पुळे येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

या व्हेकेशनमधील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिच्या बाळाच्या चेहऱ्यावर गोड निरागस हास्य दिसून येत आहे. त्यामुळे तिच्यासोबत तिच्या बाळाचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

धनश्रीने शेअर केलेला कुटुंबासोबतचा छानसा फोटो