‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील कलाकारांचे हे आहेत रिअल लाईफ पार्टनर, बघा तर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:27 AM2021-12-13T11:27:56+5:302021-12-13T11:38:00+5:30

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ही मालिका रसिकांची आवडती मालिका. आज आम्ही या मालिकेतील मुख्य कलाकारांच्या रिअल लाईफ पार्टनरबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ही मालिका रसिकांची आवडती मालिका. आज आम्ही या मालिकेतील मुख्य कलाकारांच्या खºया लाईफ पार्टनरबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

प्रार्थना बेहरे मालिकेत नेहाची भूमिका साकारते आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रार्थना बेहेरे खºया आयुष्यात विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव अभिषेक जावकर असे आहे. अभिषेक हा लेखक-दिग्दर्शक आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसतो आहे.श्रेयस तळपदेच्या पत्नीचे नाव आहे दीप्ती तळपदे. ३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे लग्न पार पडले. श्रेयस आणि दीप्ती यांना एक मुलगी आहे, जिचे नाव आद्या आहे.

मालिकेत समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने साकारली आहे. संकर्षणची पत्नीही दिसायला फार सुंदर आहे. संकर्षणच्या पत्नीचे नाव शलाका आहे. हे सुंदर जोडपं काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा बनले आहेत. या कपलला मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी या निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना गौरी आणि नंदन ही दोन मुले आहेत. मोहन जोशी यांचा मुलगा नंदन अभिनय क्षेत्रात न येता तो एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. नंदन हा इंटेरिअर डिझायनर असून रचना संसद आर्किटेक्ट स्कुलमधून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. तर मुलगी गौरी हिचे लग्न झाले असून सध्या ती बंगलोर येथे आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाली आहे.

काजल काटे हिने मालिकेत नेहाची मैत्रिण शेफालीची भूमिका साकारली आहे. तिच्या पतीचे नाव प्रतिक कदम आहे. प्रतिक हा एक क्रिकेट कोच आहे.

चैतन्य चंद्रात्रे मालिकेत परांजपे वकीलाच्या भूमिकेत दिसतो. रुंजी, एका पेक्षा एक, कुलवधू, लेक लाडकी या घरची, शुगर सॉल्ट आणि प्रेम, फ्रेंड्स, गुलमोहर अशा चित्रपट आणि मालिकेतून त्याने वेगवेगळया भूमिका साकारल्या आहे. त्याची पत्नी दिसायला फार सुंदर आहे.