या आहेत टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिन...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:20 PM2020-03-03T16:20:50+5:302020-03-03T16:36:26+5:30

'नागिन' ही मालिका पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकत आलेली आहे आणि याचं कारण आहे नागिनीच्या भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री.

टीआरपीच्या यादीत या मालिकेने 'टॉप ५' मध्ये आपली जागा बनवली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल ज्यामुळे ही मालिका हिट आहे...

मौनी रॉय - नागिन या मालिकेचा पहिला पर्व २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा भारतीय टेलिव्हीजनवरील सर्वाधिक लोकप्रिय शो ठरला. तर दुसरा पर्व २०१६ मध्ये प्रदर्शित झाला असून मौनी रॉय ने यात 'शिवण्या'ची मुख्य भुमिका साकारली होती.

निया शर्मा नागिनच्या चौथ्या पर्वात 'ब्रिंदा' नावाची मुख्या भुमिका साकारत आहे आणि तीची ही भुमिका खुपच गाजत आहे.

करिश्मा तन्ना- नागिनचा तिसरा पर्व २०१८ मध्ये प्रसारित झाला. या पर्वात करिश्मा तन्नाने नागिनीची मुख्या भुमिका साकारली होती.

सुरभी ज्योती या अभिनेत्रीने नागिनच्या तिसऱ्या पर्वात 'बेला'ची भुमिका साकारली होती.

सयंतनी घोष या अभिनेत्रीने अनेक टिव्ही मालिकेत काम केले आहे.परंतू नागिनच्या चौथ्या पर्वात तिच्या अभिनयाचे खुप कौतुक होत आहे.ती या पर्वात 'मान्यता' नावाची मुख्य भुमिका साकारत आहे.

अदा खानने देखील मोनी रॉय सोबत नागिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात काम केले आहे यात तिने 'शेषा' आणि 'रुचिका'ची भुमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने सगळ्यांची मने जिंकली आहे.

अनिता हसनंदानीने तिसऱ्या पर्वात दुसरी नागिनीची भुमिका साकारली होती.

सारा अली खानने 'ससुराल सिमर का' या मालिकेत इच्छाधारी नागिनीची भुमिका साकारली होती.