PHOTOS : ‘द कपिल शर्मा शो’ के ‘मोहल्ले की रौनक’, कोण आहे कपिलची नवी ‘गर्लफ्रेन्ड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:00 PM2022-09-01T18:00:49+5:302022-09-01T18:05:34+5:30

The Kapil Sharma Show : कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन लवकरच येतो आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या सीझनमध्ये काही नवे चेहरे तुम्हाला दिसणार आहेत. अगदी कपिल शर्माची ‘गर्लफ्रेन्ड’ सुद्धा.

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर येतो आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या सीझनमध्ये काही नवे चेहरे तुम्हाला दिसणार आहेत. अगदी कपिल शर्माची ‘गर्लफ्रेन्ड’ सुद्धा.

होय, द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनमध्ये कपिलची ‘गर्लफ्रेन्ड’ दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शोचा प्रोमो रिलीज झाला. तेव्हापासून कपिलची ही ‘गर्लफ्रेन्ड’ चांगलीच चर्चेत आहे. ती कोण तर सृष्टी रोडे.

अभिनेत्री सृष्टी रोडे कपिल शर्माच्या ‘गर्लफ्रेन्ड’च्या भूमिकेत दिसणार आहे. पिल शर्मा शोच्या या 10व्या सिझनमध्ये सृष्टीची एन्ट्री झाली आहे. या शोमधून ही ती ब-याच दिवसांनी टेलिव्हिजनवर पदार्पण करते आहे.

कपिल शर्मा शोमध्ये ती कपिलची गर्लफ्रेन्ड गजल शर्माच्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. मोहल्ल्याची रौनक बनून ती कॉमेडीचा तडका लावणार आहे.

सृष्टीने 2007 साली एकता कपूरच्या कुछ इस तरह या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती.

यानंतर सृष्टीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती छोटी बहू, पुनर्विवाह, सरस्वतीचंद्र या मालिकांमुळे.

बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्येही ती स्पर्धक म्हणून दिसली होती. 70 व्या दिवशी ती घरातून बाहेर पडली होती.

2021 मध्ये सृष्टीची मोठी सर्जरी झाली होती. यानंतर तिला फ्रक्चरही झाले होते. तेव्हापासून ती ब्रेकवर होती.